जिल्हा केमिस्ट असोसिएशनकडून दिविजा वृद्धाश्रमाला मदत

वृद्धांची केली आरोग्य तपासणी 

वैभववाडी l प्रतिनिधी :    सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोशियनच्यावतीने  जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधुन देवगड तालुक्यातील असलदे या ठिकाणी दिविजा वृद्धाश्रमातील वृध्दांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आश्रमात औषधे, डायपर, तांदूळ, गहू, डाळ, कपडे इत्यादी वस्तू सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसीएशन जिल्हाध्यक्ष श्री. आनंद रासम, सचिव श्री. संजय सावंत, श्री. दयानंद उबाळे, श्री. विजय लोके श्री. दिनेश वळंजू, श्री. मुकुंद जाधव श्री. राहुल पाटिल, श्री. विश्वनाथ गुरव, इत्यादी उपस्थित होते. या वेळी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे  डॉ. तापसे यांनी आरोग्य तपासणीसाठी मोलाची मदत केली.