राज्यस्तरीय स्पर्धेत गावठी गटात दीपक सावंत वळके तर घाटी गटात संजय सावंत साठरेबांबर यांची बैलजाडी प्रथम
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील सालपे केळवली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेत गावठी गटात वळके येथील दीपक सावंत तर घाटी गटात साठरेबांबर येथील संजय सावंत यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला.सदर स्पर्धा सालपे केळवली येथे ओम साई रिक्षा संघटना शिपोशी आणि केळवली ग्रामस्थ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी डॉक्टर अरुण जमेनीस ,लांजा येथील पप्पू मुळ्ये तसेच विभाग प्रमुख चेतन खांदारे, शिवसेना शहर प्रमुख नागेश कुरुप,दीपक नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत गावठी गटात दीपक सावंत यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक वाडावे सराड येथील सुरेश सोलकर तर तृतीय क्रमांक संगमेश्वर येथील शुभम सुर्वे यांच्या बैल जोडीने पटकावला. चौथा क्रमांक ओझरे येथील कै.सरीता अशोक कदम यांच्या बैलजोडीने तर पाचवा क्रमांक पाटगाव येथील जयसांबा प्रसन्न यांच्या बैलजोडीने पटकावला. घाटी गटात संजय सावंत यांच्या बैल जोडीने पटकावला. द्वितीय क्रमांक पाळू येथील भारत कांबळे यांनी तर तृतीय क्रमांक संगमेश्वर येथील निलेश नागवेकर यांच्या बैलजोडीने पटकावला. चौथा क्रमांक विवली येथील विरोबा मानाई प्रसन्न यांच्या बैल जोडीने तर पाचवा क्रमांक व्हेळ येथील यशवंत शिंदे यांच्या बैल जोडीने पटकावला.
स्पर्धेत सुंदर बैलजोडी यांत प्रथम क्रमांक वाडावे सराड येथील सुरेश सोलकर यांच्या पांड्या-हरण्या याबैल जोडीने तर द्वितीय क्रमांक सिताराम लोलम भोजवाडी यांच्या राजा-दादा,
तृतीय क्रमांक कोल्हेवाडी येथील राजेंद्र घडशी यांच्या. सोन्या-सुंदर, चौथा क्रमांक विवली येथील विरोबा मानाई यांच्या बावर्या व सुलतान यांनी तर पाचवा क्रमांक संजय सावंत यांच्या पर्शा व शंकर या
बैल जोडीने पटकावला
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शहानवाज सारंग, सुनील कोटकर ,अजय कोटकर, प्रकाश माजलकर, अक्षय सुर्वे, महेंद्र खुर्द तसेच फारूक सारंग, असलम लांजेकर, विकास कोलापटे ,मुकेश भालेकर यांच्यासह ग्रामस्थांनी मेहनत घेतली











