वैजी येथील मंगेश भडवळकर यांचा अंधश्रद्धा निर्मूलन देखावा ठरला सरस

गणेश भक्तांनी केले मंगेशच्या कलेचे कौतुक

देखाव्यातून दिला सामाजिक संदेश

संतोष कुळेl चिपळूण  :गणेश उत्सवामध्ये दरवर्षी विविध समाजजागृतीपर देखावे तयार करणे हा त्याचा छंदच बनला आहे. गणेशोत्सवातून प्रबोधनाची क्रांती घडावी यासाठी वैजी गावचा सुपुत्र मंगेश वामन भडवलकर नेहमी प्रत्यन करीत असतो. यावर्षी त्याने समाजहित जपताना अंधश्रद्धा निर्मुलनाचा संदेश दिला आहे. त्याच बरोबर देशाच्या आजादी का अमृत महोत्सव हा देखावा सादर केला आहे. या. देखाव्याचे सर्वांनीच कौतुक केले आहे.

चिपळूण तालुक्यातील वैजी भडवळकर वाडी येथील मंगेश वामन भडवळकर या युवकांनी दरवर्षी गणेशोत्सवात बनवलेल्या देखाव्यातून समाज प्रबोधनाचा वारसा जपला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या युवकांनी सांस्कृतिक कला जोपसताना त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आधी सुद्धा त्यांनी अनेक प्रकारचे समाज जागृती पर देखावे बनवले होते.

यावर्षी गणेशोत्सवामध्ये त्याने प्राथमिक शाळा वैजी साकारत त्या शाळेत होणाऱ्या देशाच्या आजादी अमृत महोत्सवातील शाळेतील झेंडावंदन दूष्य साकारले आहे. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून समाजप्रबोध करताना नेहमी सांगायचे की समाजातील कर्मकांड आणि अंधःश्रद्धा यावर विश्वास ठेवू नका. अगदी हाच संदेश देणारा देखावा मंगेश याने साकारला आहे. भोंदू बाबांपासून सावध राहा हा जनजागृतीचा संदेश त्याने देखाव्यातून दिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करणारा एक सुंदर देखावा त्याने या गणेशोत्सवात साकारलेला आहे. हे देखावे पाहण्यासाठीf अनेक गणेश भक्तांनी मंगेश भडवलकर यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. गणेश चतुर्थीला विराजमान झालेल्या या गणरायाचं गुरुवारी अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन करण्यात आले . मात्र या मधल्या दहा दिवसांमध्ये अनेक गणेश भक्तानी हे देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. सर्वांनीच मंगेश भडवळकर यांच्या कलेच कौतुक केलं आहे. मंगेश भडवलकर हा पाचाड येथील महावितरण कार्यालयात वायरमन या पदावर काम करीत आहे. अतिशय मनमिळावू आणि सेवाभावी वृत्तीचा युवक असल्याने सर्वांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे घरात कुठलेही शुभकार्य किंवा धार्मिक कार्य असले तर त्या ठिकाणी लोक आवर्जून गर्दी करत असतात. हा देखावा साकारण्यासाठी मांगेशच्या परिवाराची साथ त्याला नेहमीच मिळते. त्याची पत्नी, वडील वामन भडवळकर आणि सर्व परिवार यांचे सहकार्य मिळत असल्याने असे देखावे आपण साकारतो असे मंगेशने प्रहारशी बोलताना सांगितले.