मंडणगड l प्रतिनिधी : जेष्ठ नागरीक दिनाचे औचीत्यसाधून शेनाळे येथील रमेश दळवी मित्र मंडळाचेवतीने विविध कार्यक्रमांचे आय़ोजन कऱण्यात आले आहे. या निमीत्ताने आयोजीत सत्कार सोहळ्यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याहस्ते पद्मश्री दादा इदाते, डॉ. तानाजीराव चोरगे, डॉ. जयवंत जालगांवकर, डॉ.नेहा दळवी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय जेष्ठ नागरीकांना भेटवस्तु वाटप, मोफत आरोग्य तपासणी, औषधे वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यानिमीत्ताने तालुक्यातील ग्रामिण भागात आदर्श करणाऱ्या गुणवंत कर्मचारी, आदर्श शाहीर, परिक्षेत उत्तम गुण संपादीत करुन तालुक्याचा लौकीक वाढविणारे विद्यार्थी सत्कार, करण्यात येणार आहे. परिसरातील दिव्यांगाना दिव्यांग मदतनिधीचे वाटप करण्यात येणार तसेच कुपोषीत बालकांना पुरक पोषण आहार सहाय्यता निधीचे वाटप करण्यात येणार आहे. संस्थेने आयोजीत केलेल्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन झालेले असून नागरीकांनी या कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष दगडू बैकर, कार्याध्यक्ष एकनाथ दळवी, सरचिटणीस सचिन दळवी यांनी केले आहे.











