ज्येष्ठ पत्रकार जे.डी.पराडकर
माखजन | वार्ताहर : जीवनात संघर्ष करायला लागला तरी चालेल, पडेल ते काम करा,स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन पुढे चला, ध्येय गाठण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार,कला शिक्षक जे.डी.पराडकर यांनी केले.ते माखजन इंग्लिश स्कूल मध्ये १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त ते गुरुदक्षिणा सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद साठे,जनशिक्षण संस्थेच्या सौ सीमा यादव,दत्ताराम मोरे,सुशील भायजे उपस्थित होते. श्री.पराडकर पुढे म्हणाले की उत्तम वाचक भविष्यात पत्रकार होऊ शकतो.प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर कराव.तो आनंद फार वेगळा असतो.युग स्पर्धेच आहे याचं भान प्रत्येक विद्यार्थ्यांना असले पाहिजे असे नमूद केले.
दरम्यान या कार्यक्रमावेळी विदयार्थ्यांचा स्वलेखणीतून साकारलेल्या संजीवनी या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी हस्तलिखित प्रमुख संतोष कुलकर्णी यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले.तसेच विविध स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.१०५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या विविध् कोर्सेस चे उदघाट्न जनशिक्षण संस्थेच्या संचालिका सौ सीमा यादव यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष मनोज शिंदे,दत्ताराम गुरव,संदेश पोंक्षे,राजेश फणसे,दिलीप जोशी,पराग लघाटे,भाऊ पोंक्षे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी केले तर सूत्रसंचालन स्वरूपा कनगुटकर यांनी केले.तर आभार महादेव शिंदे यांनी मानले.