राज्यस्तरीय पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी ला पारितोषिक

रत्नागिरी | प्रतिनिधी : दिनांक २४ ते २६ डिसेंबर रोजी भरत नाट्यमंदिर, पुणे येथे पुरूषोत्तम करंडक महाअंतिम फेरी अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत पार पडली. यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘ कुपान’ एकांकिकेने तृतीय क्रमांकाच्या करंडकाचा मान पटकावला. शिवाय सर्वोत्कृष्ट अभिनय पुरस्कार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा शुभम गोविलकर ह्याने मिळवला. त्याच्यासोबत आर्या वंडकर, राज माने, साक्षी बने, कौशल मोहिते, साक्षी गोरे, शुभम आंब्रे, विशाल तलार, साई जीरोळे ह्या कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुरस दाखवली. एकांकिकेची तांत्रिक बाजु स्वराज साळुंखे आणि तेजस साळवी ह्यांनी सांभाळली तर मॅनेजमेंट ची बाजु सिमरन शेंबेकर , हर्ष कांबळे व प्रतीक पवार ह्यांनी सांभाळली

संघाचे मार्गदर्शक म्हणून दिग्दर्शक गणेश राऊत यांनी मदत केली , तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेत रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव, नागपूर आणि पुणे केंद्रातील एकूण १६ विजेत्या महाविद्यालयाच्या संघांनी रंगतदार सादरीकरण केले होते. सादर झालेल्या एकांकिकांमधून ४ एकांकिका करंडकाच्या मानासाठी पात्र ठरल्या यात अनुक्रमे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय , औरंगाबाद , तुळजराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आणि राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, साखराळे यांचा समावेश आहे.

पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन आयकर विभागाचे आयुक्त (सवलत) अभिनय कुंभार, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. राजेश पांडे उपस्थित होते.
याप्रसंगी कलोपासकचे अध्यक्ष अनंत निगोजकर उपस्थित होते. संजय पेंडसे( नागपूर) , सुबोध पांडे (पुणे) आणि नितीन धुंदके (पुणे) यांनी परीक्षक म्हणुन जबाबदारी पार पाडली.गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे ,प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल दत्त कुलकर्णी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.मकरंद साखळकर ,विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर , महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव व सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी यश सुर्वे , रत्नागिरीतील नाट्यप्रेमी , माजी सांस्कृतिक विद्यार्थी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व कुपन टीमचे अभिनंदन केले आहे. संघ व्यवस्थापक म्हणून रसिका नाचणकर यांनी काम पाहिले