सावंतवाडीतील युवा पत्रकारांतर्फे पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान

Google search engine
Google search engine

पत्रकार संघाचा वसा व वारसा जपणे अभिमानास्पद : प्रवीण मांजरेकर

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे सातत्याने अभिनव उपक्रम आपण राबवत आलो आहोत. हीच धुरा, हाच वसा आणि वारसा युवा पत्रकार बांधवांनीसुद्धा राबवणे अभिमानास्पद वाटते, आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक करताना घेतलेला पुढाकार निश्चितच आपल्या पत्रकारीतेला एक वेगळी उंची गाठून देईल, असा विश्वास आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी येथे व्यक्त केले.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील युवा पत्रकार बांधवांनी एकत्र येत सदर पुरस्कार विजेत्या पत्रकार बांधवांचा स्नेह सत्कार सोहळा शनिवारी हॉटेल पर्ल येथे आयोजित केला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर होते. यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे जाहीर झालेल्या मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त विनायक गांवस, ज्येष्ठ पत्रकार दयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त अभिमन्यू लोंढे, स्व. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार प्राप्त पत्रकार परशुराम मांजरेकर, हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त लुमा जाधव, डॉ. अजय स्वार पुरस्कृत जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे तसेच छायचित्रकार कै. मुरलीधर उर्फ बंडोपंत भिसे स्मृती पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार बाळा हरमलकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे अभिमन्यू लोंढे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ॲड. संतोष सावंत, सचिन रेडकर, अनंत जाधव, उमेश सावंत प्रसन्न गोंदावळे, जतीन भिसे, प्रा. रुपेश पाटील, भगवान शेलटे, सिद्धेश सावंत, राजाराम धुरी, विशाल पित्रे, प्रशांत मोरजकर, निखिल माळकर, साबाजी परब आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.