रत्नागिरी : “स्वछता हीच सेवा” मोहिमेंतर्गत अग्रणी जिल्हा बँक, बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे उद्या रविवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11 भाट्ये समुद्र किनारा आणि मांडवी समुद्र किनारा येथे 1 तासाचे सफाई अभियान राबविण्यात येणार आहे. तरी या अभियानासाठी शासकीय कर्मचारी, सामान्य नागरिक आणि ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.











