रत्नागिरी : निवळी येथे मुंबई गोवा महामार्गांवर दरड कोसळल्याने मार्ग बंद असून वाहतूक ठप्प आहे. मुसळधार पाऊस आणि अरबी समुद्रातील चक्री वादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा दरड कोसळली असून वाहतूकीवर परिणाम झाला आहे.










