गुहागर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश

 

( उच्च माध्यमिक गटात मृदुला पालकर प्रथम व प्राथमिक गटात नेहा निवातेने पटकावला तृतीय क्रमांक )

आबलोली (वार्ताहर) गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे दु.ह.वैद्य माध्यमिक विद्यालय व भा.सु.पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल या विद्यालयात गुहागर तालुकास्तरीय निबंध स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सदर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.मृदुला उदय पालकर – बारावी वाणिज्य शाखा – हिने उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक संपादन केला . कु. नेहा संदीप निवाते – इयत्ता सातवी – हिने प्राथमिक गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कु. मानसी संदीप पालकर – इयत्ता आठवी – हिने माध्यमिक गटात सहभाग नोंदवला.

गुहागर तालुकास्तरीय निबंध स्पर्धा नुकतीच गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे अंजनवेल हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाली. सदर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक या तीन गटांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक गटासाठी “निसर्ग माझा सोबती ” हा विषय असून शब्द मर्यादा ३०० होती. माध्यमिक गटासाठी ” भारतीय अवकाश मोहिमा ” हा विषय असून शब्द मर्यादा ४०० होती .तसेच उच्च माध्यमिक गटासाठी ” हे विश्वची माझे घर “हा विषय असून शब्द मर्यादा ५०० होती . सदरच्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे हायस्कूलच्या विद्यार्थिनी कु. मृदुला उदय पालकर हिने उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक संपादन केला. कु. नेहा संदीप निवाते हिने प्राथमिक गटामध्ये तृतीय क्रमांक संपादन केला. कु. मानसी संदीप पालकर हिने माध्यमिक गटात सहभाग नोंदवला. स्पर्धेतील सुयशस्वी व सहभागी विद्यार्थी यांना सौ. चव्हाण एस.एस. , श्री.आंबेकर एस.एम. , श्री.घाणेकर एस.एस. प्रा.सौ.जाधव एम.एस. व प्रा.श्री. पवार डी.वाय.आदी शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले . गुहागर तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.भालचंद्र चव्हाण , उपाध्यक्षा श्रीम. सुचिताताई वेल्हाळ , सचिव श्री.सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , प्राचार्य श्री.व्ही.डी. पाटील , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुयशस्वी व सहभागी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले.