राजापूर | प्रतिनिधी : गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान नगर परिषद कर्मचाऱ्याच्या अंगावर धाऊन जाणे प्रकरणी सोमवारी मुख्याधिकारी यांचे सोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार तसेच संबंधित व्यक्ती यांनी सदर गोष्ट अनावधानाने झालेली असून त्याबाबत दिलगीरी व्यक्त केलेली असल्याने संघटनेचे समाधान झालेले असून राजापूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार 3 ऑक्टोबर रोजीचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. तशी माहिती राजापूर नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष असलम नाईक व उपाध्यक्ष प्रदीप आसवेकर यांनी एका प्रिसध्दी पत्रकान्वये दिली आहे.
गुरूवारी २८ ह।सप्टेबर रोजी सायंकाळी ७.२४ मीनिटांनी न. प. चे सफाई मुकादम जवाहर चौक येथे कामावर असताना श्री गणेश मुर्ती विसर्जनचे मिरवणूकीमध्ये एक बैल घुसत असताना सदर बैलाला श्री. राजन जाधव हे बाजूला करीत असताना एक अज्ञात व्यक्ती आमच्या कर्मचा-याच्या अंगावर मारावयास धाऊन गेली. आमचा कर्मचारी कर्तव्याचे पालन करीत असताना तसेच कोणतीही चुक नसताना आमच्या कर्मचा-याच्या अंगावर धाऊन जाणे हे उचित नाही. अशामुळे आमच्या कर्मचा-यांचे मनोधर्ये खच्चीकरण होत असून आमच्या कर्मचा-यांच्या जीवीतास धोका उदभवत असल्याने आम्ही दिनांक ३/१०/२०२३ रोजी कामबंद आदोलन पुकारले असल्याचे निदवेद संघटनेने दिले होते.
यावर सोमवारी मुख्याधिकारी प्रशांत भोसले व संघटना पदाधिकारी व कर्मचारी यांच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला आहे., संबधितांनी सदरचा प्रकार हा अनावधानाने झालेला असून त्याबाबत दिलगीरी व्यक्त केली आहे. यावर संघटनेच्यी वतीने समाधान व्यक्त करत हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे या प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
परंतू आम्ही पूकारलेले काम बंद आंदोलन हे फक्त दिनांक २८/०९/२०२३ रोजी घडलेल्या घटने संदर्भात नसून यापूढे शहरात काम करीत असताना न. प. च्या कर्मचारी यांना त्रास दिला गेल्यास अथवा यापुढे अशी घटना कर्मचारी यांच्या विरोधात झाल्यास जाहिर निषेध नोंदवून संघटनेचे वतीने कडक पवित्रा घेण्यांत येईल. त्यामध्ये हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा ईशाराही देण्यात संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.









