राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी आणि स्व. लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगर परिषद कर्मचारी वृंदातर्फे महात्मा गांधी आणि स्व. लालबहादुर शास्त्री यांच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी प्रताप ढोणे, अभियंता संजीव जाधव आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थीत होते.यावेळी सकाळी गुजराळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राजापूर नगर परिषदेच्या स्वचच्छता अभियानाअनुषंगाने स्वच्छततेचा संदेश देणारे पथनाटय सादर केले. तर राजापूर नगर परिषदेच्या वतीने न. प. च्या आरोग्य विभागातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली.












