पूरग्रस्त केळशी गावात मदतीचा हात 

दापोली : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील केळशी गावातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या घटनेनंतर आमदार योगेश कदम यांनी ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू पोहोच केल्या आहेत. या साहित्यांचे ग्रामस्थांना तत्काळ वाटप करण्यात आले.

दापोलीचे तालुकाप्रमुख उन्मेष राजे यांच्या नेतृत्वाखाली हे वाटप करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख प्रसाद रेळेकर, माजी शहरप्रमुख सुहास खानविलकर, शहर अधिकारी स्वप्निल वि. पारकर, नगरसेविका शिवानी खानविलकर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी, युवासेना तालुका सचिव किरण बांद्रे, जालगाव शाखाप्रमुख मयूर मोहिते, शहर सचिव निखिल परब, उपशहर अधिकारी ओंकार दुर्गावळे, धनराज गुजर, दीप शिर्के, आयेश पवार नीरज दुर्गावळे, आकाश रेळेकर, साई कोर्डझा यांच्यासह सर्व शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या वस्तू ग्रामस्थांना दिल्या.