आबलोली : मुलांच्या कर्तुत्वाला चालना व शाबासकीची थाप देण्याचे काम गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पांचाळ सुतार समाज मंडळ व महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले. अंगणवाडी ते पदवीधर अशा एकूण ३५ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी,मार्गदर्शक म्हणून काशीराम पागडे,संतोष फटकरे, खालील पागडेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गोणबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील ज्या ज्या व्यक्तींच्या माध्यमातून आपण समाजातील चालीरीती परंपरा यांची माहिती जोपासतो असे वयस्कर ४० ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थी गुणगौरवा सोबतच आपल्या गावातील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सपत्नीक सत्कार करून मंडळाने आदर्शवत काम केल्याचे गौरवोद्गार प्रमुख मार्गदर्शक काशीराम पागडे यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव नितेश सुरेश पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निशा नितेश पांचाळ, प्रिया प्रदीप पांचाळ,शर्वरी प्रमोद पांचाळ, कस्तुरी राजेश पांचाळ, योगेश अनंत पांचाळ,प्रमोद बंडू पांचाळ
कार्यक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष रमेश शंकर पांचाळ, उपाध्यक्ष संजय दत्त्ताराम पांचाळ, सचिव नितेश सुरेश पांचाळ, सदस्य बंडू सिताराम पांचाळ, रामचंद्र सिताराम पांचाळ, चंद्रकांत नारायण पांचाळ,अनुसया अनंत पांचाळ, रंजना रामचंद्र पांचाळ,सविता चंद्रकांत पांचाळ,मनोहर पांचाळ, शेवंती आत्माराम पांचाळ, राजेश पांचाळ, महेश पांचाळ, सचिन पांचाळ, योगेश पांचाळ, दिलीप पांचाळ, प्रमोद पांचाळ, प्रदीप पांचाळ, सुनील पांचाळ, प्रथमेश पांचाळ, शुभम पांचाळ, ऋषिकेश पांचाळ, सर्वेश पांचाळ, कस्तुरी पांचाळ, सावली पांचाळ, राजेंद्र पांचाळ, जितेंद्र पांचाळ, विनीत पांचाळ आदी सभासदांनी प्रयत्न केले.











