जिल्हा काँग्रेसची ७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे होणार महत्वाची आढावा बैठक

रत्नागिरी | प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचने नुसार महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजी दुपारी २ वाजता लक्ष्मीबाई नारायण सभागृह, विपजोर स्कूल,सेक्टर ८ ए, ऐरोली,नवी मुंबई( रबाळे पश्चिम रेल्वेस्थनक जवळ) महत्वाची आढावा बैठक होणार आहे. तरी सदर बैठकीला सर्व तालुकाध्यक्ष , शहर अध्यक्ष,सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सूचित केले आहे