विसापूर येथे ट्रॅफिक मिरर ग्लास उद्धाटन संपन्न

पाटपन्हाळे (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील विसापूर येथे विसापूर कारुळ रस्त्यावर धोकादायक वळणावर चार ट्रॅफिक मिरर ग्लास विसापूर लोक सेवा संघ मुंबई यांच्यावतीने नुकतेच लावण्यात आले आहेत. ट्रॅफिक मिरर ग्लासचे उद्धाटन विद्येमान सरपंच सायली वेद्रे यांच्या हस्ते संपन्न झाला.त्याप्रसंगी विसापूर लोक सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष दिलीप रामाणे. खजिनदार योगेश गावडे, सुरेश आग्रे, सचिव विलास सुवरे.रविद्र बेडंळ, वसंत रामाणे, लक्ष्मण धनावडे, मनोहर गावणंग, शंकर आग्रे, धोंडू बेडंळ ,ग्रा.पं.सदस्य राहुल भागवत, गुहागर डेपोचे चालक वाहक उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आले व आदी ग्रामस्थ उपस्थित होते