शृंगारतळीतील शिवसैनिक नरेश पवार यांचा भाजपात प्रवेश

पाटपन्हाळे (वार्ताहर) शृंगारतळीतील जेष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शृंगारतळी शिवसेना शहरप्रमुख नरेश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, रुपेश विचारे, मंगेश रांगळे आदींसह तालुक्यातील असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

नरेश पवार हे गुहागर तालुक्यातील शिवसेनेतले सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. शृंगारतळी शहरप्रमुख, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, पाटपन्हाळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशी अनेक पदे भूषविले आहे.