रत्नागिरी : रत्नागिरी परिसरामध्ये आढळणारे वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, समुद्राखालील अनोखी जीवसृष्टी, वनस्पती यांच्या अप्रतिम छायाचित्रांचे प्रदर्शन भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर, आठवडा बाजार येथे आयोजित केले आहे. याला विद्यार्थी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. उद्या रविवारी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले राहणार आहे. तरी जास्तीत जास्त जास्त शालेय विद्यार्थी, पालक, नागरिकांनी प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन लेन्स आर्ट आणि निसर्ग सोबती संस्थेने केले आहे.
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून लेन्स आर्ट, निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे याचे आयोजन केले आहे. आगाशे विद्यामंदिरच्या नाटेकर सभागृहात तीनशहून अधिक फोटो झळकले आहेत.
फोटोग्राफर अक्षय मांडवकर, अर्णव पटवर्धन, अक्षय तोंडवळकर, आशिष शिवलकर, गुरू नांदगावकर, जयकांत पटेल, मंगल राणे, नेत्रा आपटे, निखिल जांभळे, निखिता शिंदे, ओंकार मोघे, प्रसाद गोखले, प्रशांत कानडे, डॉ सचिन पानवलकर, शार्दूल केळकर, डॉ. श्रुष्टी भार्गव , सिद्धेश वैद्य, सुशील कदम, डॉ उदय वंडकर, उपेंद्र बापट, विराज आठल्ये, वीरश्री रावराणे, विशाल भावे, विवेक सोहोनी, डॉ. रविंद्र गोंधळेकर, प्रतिक मोरे यांनी ही छायाचित्रे टिपली आहेत.