वेतो-यात सुरू झाली शेतीशाळा …

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वेगुर्ला यांनी वेतोरे गावामध्ये काजू पिक शेतीशाळा सुरू केली. या शाळेत कृषी मंडळ अधिकारी हर्षा गुंड, कृषी पर्यवेक्षक संदिप देसाई, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. धनंजय गोलम, कृषीसहाय्यक सौ.श्रेया चव्हाण व कृषीसखी सौ. विलासिनी नाईक उपस्थित होत्या. या शाळेत बहुसंख्येने महीला व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. गोलम सरांनी शेतीशाळेची संकल्पना विस्तृत प्रकारे मांडली. गुंड मॅडमनी विविध योजनांची माहीती दिली. या शाळेत विशेषतः ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम चे विद्यार्थी देखील उपस्थित होते . त्यांनी शेतकरी वर्गाला लाखीबाग ही कृषी विद्यापीठाची संकल्पना चित्रफलकाद्वारे व्यवस्थीत समजावली. यापुढे देखील या शाळेचे 9 वर्ग तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली भरवले जाणार आहेत. शेवटी विलासिनी नाईक यांनी सर्वाचे पुष्प देऊन आभार मानले.