सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील मिलाग्रीस प्रशालेत ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते फुलझाड देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी तथा प्रशासक वासुदेव नाईक, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर,पंचायत समिती सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.कल्पना बोडके,केंद्रप्रमुख श्रीम.स्नेहा लंगवे,मिलाग्रीस हायस्कूल अँण्ड ज्युनि.काँलेजचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदान्हा,उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल,पर्यवेक्षिका मेघना राऊळ तसेच सावंतवाडी तालुक्यातील इतर केंद्रप्रमुख,शिक्षक,पालक, विद्यार्थी आणि विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीम.कल्पना बोडके यांनी प्रास्ताविकातून विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट वास्तवाच्या कसोटीवर तपासून बुद्धिप्रामाण्यवादी बनावे, असे जयंत जावडेकर यांनी मांडले.तर विद्यार्थ्यांचे कौशल्य प्रतिकृतींच्या सादरीकरणातून दिसून येतेच,यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वासुदेव नाईक यांनी केले.विज्ञान प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सह.शिक्षिका श्रीम.अँथोनिसा फर्नांडिस यांनी करून दिला.
सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मिलाग्रीस प्रशालेचे सह.शिक्षक सुशांत जोशी यांनी व्यक्त केले