रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज alert

पावसामध्ये सातत्य नाही मात्र पडझड सुरु; निवळी येथे घरावर पडले झाड 

रत्नागिरी | प्रतिनिधी : गेल्या शनिवारी दमदार आगमन केलेल्या पावसामध्ये सातत्य नसले तरीही पडणारा पाऊस वेगवान वार्यानं सोबत घेऊन येत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड होताना दिसत आहे. दरम्यान रत्नागिरीला येत्या 4, 5 दिवसांत मुसळधार पावसासाठी केशरी आणि पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे.

मोसमी वार्यांचे आगमन झाले असतले तरीही गेले दोन आठवडे पावसाची सगळ्यांना प्रतीक्षाच होती. मात्र २४ जुन रोजी सकाळीच अनेक ठिकाणी मुसळधार सरींसह पावसाचे आगमन झाले आणि प्रत्येकजण सुखावला. मात्र असे असले तरी पावसामध्ये सातत्य नाही. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात सरासरी १३.४४ च्या सरासरीने १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर १ जुन पासून २७ अवघ्या १८४७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेने ती ५० टक्केच आहे.

मात्र असे असेले तरीही पावसासोबत वेगवान वारे मात्र वाहत असून त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. रत्नागिरी तालूक्याती निवळी कोकजे वाठार येथील प्रभाकर तांदळे यांच्या घरावर मंगळवारी पहाटे ५ वाजता आंब्याचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले आहे. यामध्ये कुणाला दुखापत झाली नसली तरीही आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान २८ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी खूप जोरदार तर २९ जुन ते १ जुलै या कालावधीत पावसाच्या जोरदार सरी कोसळतील अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. येत्या 4, 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसांत मुसळधार पावसासाठी केशरी आणि पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे.