मेरी माटी मेरा देश अभियान महोत्सवाचा वैभववाडीत समारोप
वैभववाडी | प्रतिनिधी : मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील मिट्टी कलश पंचायत समिती वैभववाडीकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. यावेळी सर्व गावातील सरपंच उपस्थित होते. वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, विस्तार अधिकारी श्री. हांडे, वरीष्ठ प्रशासन अधिकारी राजाराम लांबोरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज सावंत, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गंगाधर पाटील, श्री लोहकरे, व पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत ग्रामपंचायत यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न झाले. स्वच्छता मोहीम, पंचप्राण शपथ, वृक्षारोपण, ध्वजारोहण आदी कार्यक्रमामध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गणेश चतुर्थी च्या पार्श्वभूमीवर मिट्टी कलश कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी घरोघरी मिट्टी कलश फिरवत माती गोळा केली. गावातील मातीने भरलेला कलश मंगळवारी पंचायत समिती वैभववाडी येथील सभागृहात गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आला.