आदर्श विद्यामंदिर चिवेलीत हरित सेने अंतर्गत वन्यजीव सप्ताह उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : आदर्श विद्यामंदिर चीवेलित वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला .मुख्य म्हणजे यात विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.निबंध स्पर्धेत वन्यजीवांचे रक्षण काळाची गरज, वन्यजीव आपले मित्र.चित्रकला स्पर्धेत वन्यजीवांमुळे शोभतो निसर्ग,माझा आवडता वन्यजीव हे मुख्य विषय होते.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला.विशेष म्हणजे वन्यजीव वाचलेच पाहिजे रे हे जनजागृती पर एक पथनाट्य विध्यार्ध्यानी सादर केले. त्यातून प्रदूषणामुळे जे आजार मानवाला होतात तेच वन्यजीवांना होत असतील ना.मग याचा विचार आपण कधी करणार? हा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना या वन्यजीव सप्ताह चे महत्व व गरज समजावून सांगितले.विज्ञान शिक्षक व राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख शैलेश आंब्रे यांनी या सप्ताहाचे नियोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन महेश चव्हाण यांनी केले..