ओटवणे | प्रतिनीधी : राजा शिवाजी विद्यालय विलवडे या माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात पार पडले . यावेळी उद्घाटक म्हणून लाभलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोंकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.तर समारंभाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर माजी क्षिक्षण सभापती प्रमोद भाई कामत उपस्थित होते. यावेळी प्रमोद कामत याने संस्थेचे कौतुक करताना विलवडे हायस्कूल या पंचक्रोशी तील वैभव असून जो इमारतीचा संकल्प शाळेने केलेला आहे त्यासाठीआपण सर्वोतपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत संस्थेने केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी.कार्यक्रमाचे उद्घाटक अर्चना घारे परब मॅडम यांनी सस्थेच्या उपक्रमाचा कौतुक करताना माजी विद्यार्थी ही खरी या हायस्कूल ची कमाई असून ते ज्या पद्धतीने शाळेसाठी काम करतात ते पाहता शाळा भविष्यात निश्चितच एका वेगळ्या उंचीवर असेल आणि हाच सेवेचा वारसा इतरही मुलांनी जपाव असे सांगत या वर्षी दहावी परीक्षेसाठी बांदयाला जाणाऱ्या मुलांची येण्या जाण्याची सोय आपण करणार असून ती करण्याची संधी आपणास द्यावी तसेच शाळेच्या नूतन इमारतीस आपला खारीचा वाटा निश्चित असेल असेही सूतोवाच केले.
तसेच या सुंदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बोलविले याबद्दल ही आयोजकांचे आभार मानलेत. यावेळी माजी उपसभापती विनायक दळवी यांनी ही आपले शाळेला नेहमीप्रमाणे सहकार्य राहील याची ग्वाही देताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती कृष्णा ऊर्फ दादा सावंत,मुख्याध्यापक बुधभूषण हेवाळकर सर, माजी मुख्याध्यापक एल. एल. सावंत सर, स्कूल कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल सावंत,सोनू दळवी, बाळकृष्ण दळवी राजाराम दळवी,मसुरकर मॅडम, प्रदीप दळवी, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, ओटवणे सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर, ओटवणे माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, भालावल सरपंच समिर परब, तांबुळी सरपंच वेदिका नाईक, माजी सरपंच अभिलाष दळवी, असनीये सरपंच रेश्मा सावंत, बाळवाट सरपंच सोनाली परब, कोनशी सरपंच साधना शेट्ये, सरमळे सरपंच विजय गावडे , उपसरपंच दिपंकर गावडे, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर , ग्रा. सदस्य गणेश दळवी, शिल्पा धरणेस्नेहा दळवी, सानिका दळवी आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्कूल कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने दशक्रोशीतील उपस्थित सर्वच सरपंच,उपसरपंच, यांचा शाल श्रीफळ देत सन्मान करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यावर्षी दहावी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त वैष्णवी भानुदास कांबळे, द्वितीय क्रमांक यशश्री दळवी, दीक्षा दळवी, तृतीय क्रमांक पूर्वा गवस यांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. आठवी नववी बरोबरच क्रीडा प्रकारात जील्हा स्थरावर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचाही गौरव करण्यात आला. यावेळी मुकुंद कांबळे सरांनी शाळेचा वार्षिक अहवाल वाचन करताना शाळेचे प्रगती पुस्तकच उपस्थितांच्या समोर ठेवले. कार्यक्रमाचं प्रास्तविक मुख्याध्यापक हेवाळकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन पाडवी सर तर आभार सुहास बांदेकर यांनी मानले. यानंतर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे मुलांचे गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम उशिरापर्यंत सुरु होते . मुलांच्या सुंदर कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात