मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात एकाचा मृत्यू

हातखंबा गावावर शोककळा

महामार्गावर दोन तास वाहतुक ठप्प 

रत्नागिरी | प्रतिनिधी :मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे. हातखंबा येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 18 ऑक्टोबर रोजी बुधवारी संध्याकाळी उशिरा घडली आहे. कोल्हापूर कडून हातखंबाकडे येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. समोरासमोर मालवाहू गाड्यांमध्ये मध्ये हा अपघात झाला आहे. आयशर टेम्पो व ट्रक यांच्यात हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास वाहतुक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या होत्या. राजेंद्र बाबल्या डांगे (वय ४० या हातखंबा) येथे राहणाऱ्या स्थानिक ग्रामस्थाचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर खोळंबलेले ट्रॅफिक रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचे रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक मारुती जगताप व कर्मचाऱ्यांकडून सुरू होते. हातखंबा येथे राहणारे राजेंद्र डांगे हे घरे बांधण्याची काम करायचे आणि कोल्हापूरमधून लाद्या आणण्यासाठी ते गेले होते पण कोल्हापूर मधून रत्नागिरी येथे परत येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला या ट्रक मधील लाद्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रत्नागिरी नजीक हातखंबा येथे झाला अपघात अंगावर दगडी लाद्या पडल्याने हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रक ड्रायव्हर आतमध्ये अडकून पडला होता त्याला बाहेर काढून दोन जखमी व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कोल्हापूरहुन लाद्यांनी भरलेला आयशर (गाडी क्रमांक MH ०९ EM ८६९८) हा (चालक नाव माहिती नाही) हातखंबा दिशेने येत होता. तर (गाडी क्रमांक MH ०९ FL ९१५३) हा पालीच्या दिशेने जात होता. डांगे कुटुंबातील कर्ता पुरुष या अपघातात गेल्याने या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रत्नागिरी नजीक हातखंबा येथे मुंबई गोवा महामार्गावर गावानजीक असलेल्या पुलावर समोरासमोर ट्रक व याच्यामध्ये टक्कर होऊन लादी ने भरलेला ट्रक महामार्गावर झाला पलटी रस्त्याने ट्रक मध्ये असलेल्या व्यक्तीवर लाद्या पडून जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे हातखंबा गावावर शोककळा पसरली आहे. राजेंद्र डांगे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली एक मुलगा असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त कळताच रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्तांना मदत करून महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक वाहतूक सुरळीत केली.