ओटवणे (प्रतिनीधी) रवळनाथ वाचनालय ओटवणे येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवा निमीत्त शुक्रवार २० ऑक्टोबर ठीक ९ वाजता नवोदित बुवा दत्ता पाटील पिंगुळी . अमित मेस्त्री आणि बुवा योगेश प्रभू यांचे शिष्य तसेच ओटवणे दशक्रोशिती नामवंत सरमळे येथील नवोदित बुवा संजय गावडे गुरुवर्य समिर गावडे यांचे शिष्य यांच्यात डबल बारी चा सामना रंगणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष आत्माराम गावकर तसेच वाचनालय अध्यक्ष प्रभाकर गावकर यांच्या कडून करण्यात आले आहे. अनेक समाजिक धार्मिक, सांस्कृतीक प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी असणाऱ्या या नवरात्रोत्स वात नवोदितांना कायमच संधी देण्यात येते.असे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळाच्या व्यासपिठावर होणारा हा डबल बारीचा सामना पाहण्यासाठी उपास्थित राहण्याचे आवाहन नवरात्रोत्सव मंडळा कडूनही करण्यात आले आहे.