प्रभावती कम्प्युटर एज्युकेशन संस्थेचे संचालक संदीप देवळी कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील सुप्रसिद्ध प्रभावती कम्प्युटर एज्युकेशन संस्थेचे संचालक संदीप महादेव देवळी यांना संगणक प्रशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल कोकण रत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. जेष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांच्या हस्ते त्यांचा हा गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संदीप देवळी हे मळगाव गावचे सुपुत्र असून जिद्द,मेहनत ,महत्त्वकांक्षा आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी संगणक प्रशिक्षण क्षेत्रात मोठी मजल गाठली आहे. पदवीनंतर नोकरीत अडकून न पडता समाजातील भविष्यातील गरजा ओळखून स्वतःची शासनमान्य संगणक संस्था स्थापन करून आजवर तब्बल १६ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले. सावंतवाडी शहरातील गांधी चौक या मुख्य बाजारपेठेत ‘प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन’ या नावाने सुरू असलेल्या या संस्थेने २६ व्या वर्षात पदार्पण करत प्रगतीचे शिखर गाठले आहे.

‘महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची’ मान्यताप्राप्त या संस्थेमध्ये एम.एस.सी.आयटी.पासून डीटीपी, फायनान्शिअल अकाउंटिंग, वेब डिझाईनिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आधी कोर्सेस शिकवले जातात या ठिकाणी ऍडमिशन घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकीय ज्ञान उत्तम रित्या दिले जाते.संस्थेची एकूणच यशस्वी वाटचाल पाहता संस्थेला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत यामध्ये २००३ साली दिल्ली येथे राष्ट्रीय विकास गोल्ड ॲवार्डने संस्थेला गौरविण्यात आले. तर कोल्हापूर येथे आदर्श फाउंडेशन या संस्थेकडून त्याला गौरवण्यात आले. याचबरोबर जनमित्र गौरव पुरस्कार संस्थेला मिळाला आहे एकूणच संकटाला न घाबरता आणि गरिबीने खचून जातात जिद्दीने यश कसे मिळवावे हे संदीप देवळी यांनी दाखवून दिले असून आजच्या पिढीला हे व्यक्तिमत्व आदर्शवत असेच आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबाबत सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.