रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा कार्यकारणी नुकतीच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केली आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पदी अविनाश पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश पावसकर हे युवासेना त्यानंतर स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघटना, भाजपा जिल्हा चिटणीस अशा विविध पदांवर आजपर्यंत त्यांनी काम केले आहे. आता पुन्हा नव्याने भाजपा युवा मोर्चा चिटणीस या पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अविनाश पावसकर हे गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असून कट्टर राणे समर्थक अशी त्यांची ओळख आहे. युवा मोर्चा चिटणीस पदी नियुक्ती होताच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवकांसाठी असलेल्या विविध योजना गावोगावी अभियान राबवून पोहोचवणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे अविनाश पावसकर यांनी म्हटले आहे.