रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी पोलिसांनी मिरकरवाडा जेटीवर शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी धाड टाकत गांजाची विक्री करणाऱ्या सहा जणांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजासह 58 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सव्वाचार वाजता मिरकरवाडा जेटी नंबर २ येथे प्रेम जालुराम चौधरी हा अरमान शेठ यांच्या बोटीवर गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगून असलेला पोलिसांना सापडला. त्याच्याकडून ३१० gram वजनाचा 6200 चा गांजा जप्त करून प्रेम जालुराम चौधरी याच्यावर एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शुक्रवारीच शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता सुमारास मिरकरवाडा जेती नंबर ३ येथे वीरबहादूर केदुराम चौधरी, विकास मंटू चौधरी, निखिल विष्णू ठारू, शंकर कृष्णा चौधरी आणि राजकुमार आसाराम दंगवरा या पाच जणांकडे 780 ग्रॅम वजनाचा 24 हजार 700 रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ तसेच 27 हजार 160 रुपये किमतीचे तीन मोबाईलचे हँडसेट जप्त करण्यात आले. या पाचही जणांवर एनडीपीसी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











