रत्नागिरी : शहरानजीकच्या मुरुगवाडा येथील मद्यविक्रीच्या दुकानाच्या समोर सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यप्राशन करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
श्यामलाल खडक बहादुर चौधरी हा शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुरुगवाडा येथील मद्यविक्रीच्या दुकानाच्या समोर रस्त्याच्या बाजूला मद्यप्राशन करण्यासाठी बसला असताना त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. तर याच ठिकाणी संजय दिलीप मासमार यालाही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळल्याने त्याच्यावरही शहर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे












