रत्नागिरी शहरात दाम्पत्याची तरुणीला तीच्या घरात घुसून मारहाण; वडिलांना दमदाटी

रत्नागिरी ः प्रतिनिधी l

शहरातील जिल्हा परिषद जवळील शंखेश्वर पार्कमध्ये दाम्पत्याने तरुणीच्या घरात घुसून तिच्या वडिलांशी वाद करत तिला मारहाण केली.ही घटना शनिवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वा.घडली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर रहाटे आणि रसिका समीर रहाटे (दोन्ही रा.शंखेश्वर पार्क डी-18,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.त्यांच्या विरोधात सिमरन संजय नलावडे (21,रा.शंखेश्वर पार्क,रत्नागिरी) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी दुपारी 2 वा.रहाटे दाम्पत्य नलावडे यांच्या फलॅटमध्ये घुसले. त्यानंतर सिमरनच्या वडिलांना तु माझ्या मुलाला किडनॅप करतोस का असे बोलून त्यांच्याशी वाद घालू लागले.दरम्यान रसिका रहाटे हिने सिमरन नलावडेच्या अंगावर धावत जाउन हाताच्या नखांनी तिच्या गळ्याजवळ ओरबाडून मारहाण केली.तसेच समीर रहाटेने तिचे केस ओढून डोके भिंतीवर आपटून मी दगडी चाळीतून आलो आहे.तुम्हाला चांगलाच धडा शिकवेन अशी धमकी दिली.याप्रकरणी संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 452,352,323,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.