रत्नागिरी ः प्रतिनिधी l
बेदरकारपणे टँकर चालवून महावितरणच्या पोलला धडक देत अपघात करुन त्याची खबर न देता पळाल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही धटना शनिवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा.निवळी येथील वॉटरपार्कजवळ घडली.
याप्रकरणी धनाजी कृष्णराव कळेकर (39,मुळ रा.गडहिंग्लज कोल्हापूर सध्या रा.पाली,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी सकाळी निवळी ते जयगड जाणार्या टँकर (एनएल-01-के-4368) वरील चालकाने रस्त्याच्या विशिष्ट रस्त्याकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे टँकर चालवत निवळी येथील वॉटरपार्कजवळील महावितरणच्या निवळी-पाली 33 केव्ही वीज वाहिनीचा पोल नं 52 ला धडक देत अपघात केला.यात पोल वाकल्याने नुकसान झाले आहे.याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्राीमण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 279,427,मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











