चिपळूण ( वार्ताहर) कोळकेवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ. सरिता राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच सौ. सुरेखा बोलाडे यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली. सौ. सरिता राणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर त्यांना सहकार्य ग्रामसेवक पिंगळे यांनी केले.यावेळी माजी सरपंच तसेच कोळकेवाडी सोसायटी चेअरमन सचिनभाऊ मोहिते, उपसरपंच श्रीकांत निगडे, माजी सरपंच पल्लवी ताई शिंदे, सुरेखाताई बोलाडे व सदस्या सुनीताताई वरक उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन, प्रबोधन करून कामे करणार तसेच ग्राम सभेत महिला व ग्रामस्थांचा सहभाग वाढवणार असल्याचे सौ. राणे यांनी आपल्या मनोगतात विचार व्यक्त केले.त्यांच्या निवडीचे शिव सेना उप जिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे, तालुका प्रमुख विनोद झगडे, उप तालुका प्रमुख चंद्रकांत राणे, उप विभाग प्रमुख सतीश शिंदे, बाळासाहेब शिंदे, नरेश राणे, सीताराम जागडे, हरिश्चंद्र मोरे, दत्ताराम लांबे, अंकुश राणे, दिलीपजी मोहिते,शरदभाई शिंदे इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.