विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थीमच्या आधारे आपल्या कौशल्यांमधून कलाकृती केल्या सादर
मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूल मध्ये ‘कला प्रदर्शन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या निमित्ताने बाल भारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थीमच्या आधारे आपल्या कौशल्यांमधून कलाकृती तयार केल्या. या कला प्रदर्शनासाठी सन्माननीय पाहुणे श्री. शैजु (एम आर डीजीएम, एनटीपीसी) श्रीम. गुंजन शर्मा ( वरिष्ठ व्यवस्थापक, एचआर, आरजीपीएल) श्री. सेल्वागनपती, (वरिष्ठ व्यवस्थापक, एचआर, केएलएल), श्री. कुमार स्वामी बत्तुला( वरिष्ठ व्यवस्थापक, केएलएल), श्री.रत्नस्वामी, (एल अﬞन्ड टी, प्रोजेक्ट डायरेक्टर, केएलएल) श्री.नितीन खानविलकर,( साईट इन्चार्ज,युपीएल ) त्याचबरोबर गुहागर तहसिलदार श्रीम.प्रतिभा वराळे, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, श्री. इंद्रमणी राव, (उपाध्यक्ष, पालक संघ), सौ. रुची संसारे,( प्रतिनिधी, पालक संघ),श्रीम. शिखा शिन्घ,(असिस्टंट सेक्रेटरी, पालक संघ )आणि श्री. पौल के वियेपिये, डीसी, सीआयएसएफ, श्री. रमेश चौरासिया,( प्रतिनिधी, पालक संघ,) श्री.मंगेश गोरीवले, (अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ )आणि आदरणीय पालक यांची उपस्थिती लाभली.
उपस्थितांचे स्वागत व सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरजीत चटर्जी यांनी केले. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. फुलपाखराचे पंख सोडून कला प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. सन्माननीय पाहुणे श्री.शैजु एम आर, डीजीएम, एनटीपीसी व गुहागर तहसिलदार श्रीम.प्रतिभा वराळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे व कौशल्याचे शब्द सुमनानी कौतुक केले. या कला प्रदर्शानात प्री- स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झाडांपासून मिळणाऱ्या वस्तूंपासून कलाकृती तयार केल्या. प्री- प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्था यावर कलाकृती तयार केल्या. तर १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी उत्तम कोलाज तयार केले. ३ रीच्या विद्यार्थ्यांनी कार्ड बोर्ड हाउस व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी वाﬞल हﬞन्गिंग तयार केले. तर ५ वीच्या विद्यार्थ्यांनी पॉट पेंटिंग व ६ वीच्या विद्यार्थ्यांनी पेपर स्ट्रो व वाﬞल हﬞन्गिंग बनविले. ७ वीच्या विद्यार्थ्यांनी कप मेकिंग व बॉटल डेकोरेशन व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी टी–शर्ट पेंटिंग व मंडल आर्ट पेंटिंग तयार केले आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांनी डूडल आर्ट व थ्रीडी शेप्स मधून कलाकृती टायर केल्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित च̆टर्जी सर,कला शिक्षक श्री. राहुल हेगिष्टे, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.