भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी स्वप्नील गोठणकर, अ‍ॅड. सुशांत पवार यांची निवड

bjp

राजापूर | वार्ताहर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी घोषीत करण्यात आली आहे. यामध्ये राजापूर येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते स्वप्नील गोठणकर व अ‍ॅड. सुशांत पवार यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषीकेश केळकर यांनी नुकतीच युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये राजापूर तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले आहे.

युवा मोर्चा उपाध्यक्षपदी जब्बार काझी तसेच महिला उपाध्यक्षपदी सोनल केळकर, चिटणीसपदी अनिकेत मोंडे, रसिका सावंत, कार्यकारिणी सदस्यपदी यश मराठे, निखिल मौर्ये, दिपक मांडवकर यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुका भाजपाचे वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.