भुईबावडा घाटात ट्रक दरीत कोसळला : चालक ठार
वैभववाडी प्रतिनिधी
भुईबावडा घाटात चिऱ्याचा ट्रक जवळपास तीनशे फूट दरीत कोसळला आहे. या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे. आज सकाळी 7 वा. च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच सह्याद्री जीव रक्षक करूळ ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
रेस्क्यू टीमचे प्रमुख हेमंत पाटील, विजय सावंत, अनिल पाटील, विजय पवार, राजेंद्र वारंग, देवेंद्र पवार, संजय पवार, सुरज शिंदे, वसंत पाटील,पाटील, जितेंद्र पवार जगदीश पाटील सुधीर पवार,कुलदीप सावंत, रवींद्र चव्हाण, रघुनाथ चव्हाण, शुभम माळकर, संकेत पाटील, चंद्रकांत पवार आदी सह्याद्री रक्षक दरीतून मृतदेह बाहेर काढत आहेत.










