हातिवले टोलनाका, जकात नाक्यावर ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले स्वागत
राजापूर (प्रतिनिधी): गुरूवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचे राजापुरात जंगी स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्गकडून रत्नागिरीकडे आगमन होताना राजापुरात महामार्गावर हातिवले येथील टोल नाक्यावर व त्यानंतर पुढे राजापूर शहरात जकात नाक्यावर निलेश राणे यांचे राजापुर तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
निलेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है चा नारा देत राजापुरात राणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
प्रारंभी हातिवले येथील टोल नाक्यावर राणे यांचे आगमन झाले. या ठिकाणी ढोलताशांच्या गजरात भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गाडयांच्या ताफ्यासह राजापूरकडे रवाना झालेल्या राणे यांचे शहरातील प्रवेशद्वारावर जकात नाक्यावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्याच्या वतीने राजापूर दक्षिण मंडळचे तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष भास्कर सुतार यांसह पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालुन निलेश राणे यांचे स्वागत केले. तर अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन राणे यांचे स्वागत केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, विधानसभा निवडणुक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव अनिलकुमार करंगुटकर, राजापूर दक्षिण मंडळचे तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष भास्कर सुतार, चंद्रकांत लिंगायत, दिपक बेंद्रे, युवा मोर्चा अध्यक्ष अरविंद लांजेकर, अमजद बोरकर, समीर खानविलकर, वसंत पाटील, बाळ दाते, आशिष मालवणकर, संदेश आंबेकर, राजा खानविलकर, प्रसाद पळसुळेदेसाई, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुयोगा जठार, सौ.शितल पटेल, सौ. शितल गोठणकर, सौ. रसिका कुशे, सौ. रेणुका गुंडये, सौ. सोनल केळकर, शितल रहाटे, शहर अध्यक्ष विवेक गुरव, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गोठणकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर, सुनिल भणसारी, विद्याधर राणे, मिलिंद देवधर, संतोष धुरत, हरिश्चंद्र शिवगण आदींसह राजापूर शहर व तालुका परिसरातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.











