सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय चव्हाण यांचे प्रतिपादन
कुडाळ तालुका दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटनेच्या वतीने ‘माझा लोकराजा ‘ महोत्सवाचे आयोजन
कुडाळ । प्रतिनिधी : लोकराजा कै. सुधीर कलींगण यानी आपल्या अभिनय व संवादाच्या ताकदीवर रसिकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. त्यांचा हाच वारसा जतन करायला हवा. तुम्ही कलाकार आहात रंगमचाचे सेवक आहात. आपल्या लाल मातीतल्या दशावतार लोककलेला आपण पुढे नेले पाहिजे. आपण कुणासमोर झुकायचे नाही, तर दुसऱ्याला झुकायला लावले पाहिजे. दशावतार लोककलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय व राजकिय शक्तींना झुकायला लावण्याची ताकद तुम्हा कलाकारांमध्ये आहे. त्यासाठी सघटीत प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन सेन्सॉर बोर्डाचे सदस्य तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी माझा लोकराजा महोत्सवात कुडाळ येथे बुधवारी व्यक्त केला.
कुडाळ तालुका दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटनेच्या वतीने दशावतारातील दिग्गज दशावतार कलाकार सुधीर कळीगण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी “माझा लोकराजा “महोत्सव ” येथील सिद्धीविनायक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर,लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर ,जेष्ठ दशावतार कलाकार यशवंत तेंडोलकर , तुकाराम ( अण्णा ) गावडे ,कुडाळ तालुका दशावतार कलाकार बहुद्देशीय संघाचे सल्लागार राधाकृष्ण ( बाबली ) नाईक , सिंधुदूर्ग जिल्हा दशावतार कलाकार बहुद्देशीय संघटना अध्यक्ष बाळू कोचरेकर, खानोलकर दशावतार मंडळाचे बाबा मेस्त्री , भजनी बुवा अभिषेक शिरसाट, पखवाद विशारद महेश सावंत,ग्रामविस्तार अधिकारी आनंद कुंभार,शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धूरी ,अमोल राणे ,अँड पी. डी देसाई ,सुधीर कलिगण ,शिवसेनेचे अतूल बंगे,सुधीर कळीगण
यांच्या पत्नी शुभांगी कळीगण , सुपुत्र सिद्धेश कळीगण व पंकज कलिगण, नेरूरचे माजी सरपंच शेखर गावडे,शरद नाईक , दशावतार कलाकार दत्तप्रसद शेणई, दादा राणे- कोंनसकर, सुधीर तांडेल, बाळा कळीगण,विलास तेंडोलकर, कृष्णा घाटकर, दिलीप धुरी आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री चव्हाण म्हणाले,आपणही एक रंगमंचाचा सेवक आहे. कालपर्यंत प्रशासनाचा अधिकारी असल्याने प्रशासनाच्या चौकटीत राहून करीत होतो. आजपासून एक रंगकर्मी व रंगमंचाचा सेवक म्हणून तुमच्या सोबत ज्या लोककला आहेत त्यांना राजाश्रय मिळण्यासाठी काम करणार आहे. आपल्या सेवानिृवृत्तीनंतर पहिला दिवस या स्त्युत अशा सांस्कृतिक कार्याने सुरुवात होत आहे ,असे सांगून कुडाळ तालुक्यात २७ दशावतार मंडळे आहेत, तर जिल्ह्यात १७४ मंडळे कार्यरत आहेत या सर्व मंडळांना याच सभागृहात एकत्र आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे, असे सांगितले.
कै. सुधीर कलिगण यांनी आपल्या कला सादरीकरणाने रसिकांच्या मनात घर केले होते. तुम्ही कलेने हुरळून जाऊ नका. या कलेला तुमच्या योगदानाची गरज आहे,असे आवाहन करून वृध्द कलाकार मानधन समितीचा अध्यक्ष हा दशावतार कलाकार व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी परशुराम गंगावणे म्हणाले , दशावतार लोककला गावागावात मनोरंजनाचे माध्यम होते आणि आणि आजही आहे. ठाकर लोककला गावोगावी जाऊन सादर केली. त्यातील योगदानामुळे आपल्याला मिळालेला हा पद्मश्री या सिंधुदूर्ग आहे. लोकराजा सुधीर कलिगण याचे त्यांच्या लहानपणचे लवकुंश नाटक आपण पाहिले त्यावेळपासुन हा लोकराजा सर्वसामान्याच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे.बते दीर्घायुष्य झाले असते तर त्यांनाही पद्मश्री मिळाला असता. त्याच्या मुलांनी त्यांचा वारसा उचलला आहे या कलाकाराची ओळख होण्यासाठी त्याला शासनाच्या ओळखपत्राची गरज आहे. या कलेकडे तुमच्या मागण्या चां प्रस्ताव शासनाकडे पोहोचविण्यासाठी आपण तुमच्या सोबत आहे,अशी ग्वाही त्यांनी दिली.
भालचंद्र केळुसकर म्हणाले, न्याय्य हक्कांसाठी लढा द्यायचा असेल तर संघटीत होणे काळाची गरज आहे.आपल्यामध्ये वाद असेल, तर तो बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. या कलेला लोकाश्रय आहे.म्हणून ती जिवंत आहे. संघटना मजबूतीतून आपली ताकद दाखवा,असे आवाहन केले.
प्रास्ताविकात तालुका संघाचे सल्लागार मोरेश्वर सावंत यांनी कुडाळ तालुक्यात दशावतार कलाकार एका छत्राखाली आले पाहिजेत या उदात्त हेतूने तालुका संघटना स्थापन करण्यात आली. संघटनेचा हा पहिलाच माझा लोकराजा महोत्सव आहे. लाजरी क्रिकेट ग्रूपने या कलेला गेली अनेक वर्षे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले. या कलेला लोकाश्रय मिळाला मात्र जोपर्यत राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत आमचा शासन दरबारी लढा सुरूच राहणार,असे सांगितले.
यावेळी सुधीर कलिंगण कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. अनंत बागवे कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.तसेच जेष्ठ दशावतार कलाकार तुकाराम ( अण्णा ) गावडे व यशवंत तेंडोलकर याचा तसेच तालुक्यातील एकूण २७ दशावतार मंडळे असून मालक ,चालक ,संचालक यांचा आणि मान्यवर पत्रकार व या कलेसाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या तालुका संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त तेंडोलकर,सल्लागार मोरेश्वर सावंत,उपाध्यक्ष हरी (ओंकार) सावंत, नाथा काळसेकर ,उदय मोर्यें, प्रशांत तेंडोलकर,विनायक सावंत, मिलिंद नाईक,जगदीश नाईक व अन्य सदस्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.निवेदन बादल चौधरी यांनी,तर आभार अँड देसाई यांनी मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार मंडळाचा पराशक्ती दहन हे नाटक सादर करण्यात आले.












