सावंतवाडी । प्रतिनिधी : सातार्डा येथील चेकपोस्टवर अवैध गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले. दिगंबर पांडुरंग नाईक (रा. सोनुर्ली.) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ८ हजार ६४० रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर नाईक हा सातार्ड चेकपोस्टवरून गोवा बनावटीची दारू घेऊन पायी जात होता. यावेळी संशय आल्याने चेक पोस्टवरील पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एकूण ८ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. ही करवाई रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. याबाबतची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.