स्थानिकांना सेवेत घेण्याची हमी दिल्यास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी देणार स्वमालकीची जागा

Google search engine
Google search engine

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांचा प्रस्ताव

सावंतवाडी । प्रतिनिधी : जागा उपलब्ध होत नसल्याने गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मार्गी लागण्यासाठी आता मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिकांना या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सेवेमध्ये सामावून घेण्याची हमी दिल्यास आपल्या स्वमालकीची जागा हॉस्पिटलसाठी देण्याची तयारी हेमंत मराठे यांनी दर्शविली आहे. त्यामुळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत प्रशासन हा प्रस्ताव स्वीकारतील का हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शासनाने शासकीय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे अशी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेची गेले कित्येक वर्षाची मागणी असून स्थानिक आमदार तथा विद्यालय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेली अनेक वर्षे याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील जागेवर यासाठीचा भूमिपूजनाचा नारळ ही वाढविण्यात आला. मात्र, त्यानंतर जागे बाबतचा तिढा न सुटल्याने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा विषय आजपावेतो रेंगाळतच राहिला. त्यामुळे स्थानिक नागरिक व ग्रामीण भागातील रुग्णांना गोवा बांबुळी रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांचा पर्याय निवडावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आता मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल जागा नसल्याने रद्द होत असल्यास जनतेचे हित लक्षात मळेवाड येथे मराठे कुटुंबीयांच्या मालकीची जागा हॉस्पिटल करिता विना मोबदला देण्याची तयारी मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दर्शविली आहे. मात्र, मळेवाड कोंडूरे गावासह दशक्रोशीतील बेरोजगारांना या मल्टिस्पेशिलीटि हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून घेण्याची हमी दया आणि हॉस्पीटलच्या कामाला सुरुवात करा असा प्रस्ताव मराठे यांनी ठेवला आहे. तरी प्रशासनाने आता वेळ न काढता यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी मराठे यांनी केली आहे.