रत्नागिरी | प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटातील तीव्र उताराच्या वळणात ट्रक दरीत उलटून अपघात झाला.यात चालक जखमी झाला असून अपघाताची ही घटना श्ाुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी रात्री 11.45 वा.घडली होती.
रामानुज रामआधार राजभर (35,मुळ रा.उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.3 नोव्हेंबर रोजी तो आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-04-जीआर-0977) घेउन गोवा ते वाशिंद शहापूर असा जात होता.तो निवळी घाटात आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सूटल्याने ट्रक रस्त्यालगतच्या दरीत उलटून अपघात झाला होता.या अपघातात चालकाच्या डोक्याला,हातांना दुखापत होउन ट्रकचेही मोठे नुकसान झाले होते.या अपघात प्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 279,337 मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












