नेपाळी कामगार मळगाव रेल्वस्थानकातून हरवला

कोणाला माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..

वेंगुर्ले : नेपाळ येथून सिंधुदुर्गात शिरोडा येथे बागेत कामासाठी येणारा नेपाळी कामगार मळगाव रेल्वे स्टेशन येथून हरवला आहे. या कामगारा बाबत कुणाला माहिती मिळाल्यास शिरोडा येथील आंबा बागायतदार सचिन गावडे मोबाईल क्रमांक 70668 51608 यांच्याशी किंवा शिरोडा पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन श्री. गावडे यांनी केले आहे.