रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये तात्पुरती नियुक्ती केलेल्या ७०० शिक्षकांच्या मानधनासाठी तरतूद केलेल्या मात्र संपुष्टात आलेल्या निधीची शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. शासनाने ६ कोटी ९३ लाखांची तरतूद करून या बाबतचा शासन निर्णयही काढला आहे. त्यामुळे निधीअभवी त्या शिक्षकांवर येणारे गंडांतर टळले आहे.
जिल्हा परिषद सेसमधून तात्पुरत्या शिक्षकांच्या मानधनासाठी यापूर्वी २ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम संपुष्टात आली होती.











