उपाध्यक्ष पदी सुहास देसाई
बांदा | प्रविण परब : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष परब तर व्हाइस चेअरमनपदी सुहास देसाई यांची बिनविरोध निवड झाली. मावळते चेअरमन एस. व्ही. नाईक यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्थेच्या बांदा येथील कार्यालयात निवड प्रक्रिया संपन्न झाली. चेअरमन पदासाठी मतदान न घेता बिनविरोध निवडणुक करण्यावर एकमत झाले. त्यानुसार चेअरमन पदी बांदा प्रशालेचे ग्रंथपाल संतोष जगन्नाथ परब यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. तर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास नारायण देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी संचालक गजानन सावंत, गणेश देसाई, सुनील परब, सुरेश राठोड, अरुण सुतार, सुरेश सावंत, संपदा देसाई, पूर्वा गवस, शुभा गावडे आदी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सावंतवाडी सहाय्यक निबंधक आर. एस. आरोंदेकर यांनी काम पाहिले. यावेळी सचिव पृथ्वीराज बांदेकर, सहसचिव मोहन फाटक उपस्थित होते. यावेळी सर्व प्रशालेतील सभासद उपस्थित होते.