निवळी कोकजेवठार येथील नदीच्या पात्रात सापडला अज्ञाताचा मृतदेह

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील निवळी कोकजेवठार येथील नदीच्या पात्रात बुधवार 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8.45 वा. अज्ञात प्रौढाचा मृतदेह मिळून आला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत निवळी गाव पोलिस पाटिल शितप यानी ग्रामीण पोलिसांना खबर दिली.त्यानुसार,कोकजेवठार गावातून वाहणार्‍या नदीच्या पात्रात नमशी शेतीच्या बाजुला त्यांना एका अज्ञात प्रौढाचा मृतदेह दिसून आला.गावातील इतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी जाउन मृतदेह पाहिल्यावर तो परिचयाचा नसल्याने त्यांनी याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.