चिपळूण ( वार्ताहर) : तालुक्यातील चिवेली व चिवेली लोणारी बंदर अशी दोन महसूल गावे आहेत. या ठिकाणी दोन पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पोलीस पाटलांचा सत्कार सरपंच योगेश शिर्के व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
चिवेली पोलीस पाटील वैभव वसंत घाणेकर व चिवेली लोणारी बंदर या महसूल विभाग प्रमाणे किरण लहू शिर्के यांना मंगळवारी नियुक्त पत्र देण्यात आली. या दोन्ही पोलीस पाटील यांच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा ग्रामस्थांनी ठेवली आहे. कायद्याचा अभ्यास, परिस्थितीचे भान, तडजोड, आणि निःपक्ष पाती न्याय देणे यातच त्यांची कसोटी आहे.
दोन्ही पोलीस पाटील यांना शाळा शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी सरपंच योगेश शिर्के, ग्रामसेवक श्री आडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक शिर्के, कृष्णा पडवळ, रजनी शिर्के, शोभा फागे, प्राजक्ता दनदणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्रीपाद शिर्के, संजय शिर्के, संतोष बंगाल, संतोष पडवळ, लहू शिर्के, दिलीप जाधव उपस्थित होते.












