कलाक्षेत्रातील रंगकर्मी वामन गमरे यांची अचानक ” एक्झिट “

महाराष्ट्र शासनचे उत्कृष्ट ‘ रंगभूषाकार ‘ म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त

दिवाळी सणातच गमरे कुटुंबात दुःखाचा अंधार 

संतोष कुळे l चिपळूण :कलाकार आणि कला यांचे अतूट नातं असते. हेच कलेचे नाते आयुष्यभरासाठी ज्यांनी जपले असे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रंगभूषाकार वामन काशीराम गमरे यांचे 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता तीव्र हृदयविकाऱ्यांच्या झटक्याने मुंबई येथे निधन झाले. अचानक वामनदादा गमरे गेले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहून लागल्या. असा हा रंगकर्मी सर्वांना पोरका करून गेला.

दिवाळीच्या सणात वामन गमरे यांचे निधन झाले. दिवाळी साठी त्यांनी स्वतः घराची आदल्या दिवशी साफ सफाई केली. त्यांनतर १४ नोव्हेबर दिवस उजाडला. हा दिवस त्यांचा आयुष्याचा अखेरचा दिवस ठरेल असे त्यांनीही वाटले नव्हते. सकाळी उठल्यावर ते उत्तम होते. मात्र अचानक त्यांना तीव्र हृदय विकाराच्या झटका आला. हॉस्पिटल मध्ये नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. दिवाळी प्रकाशमय होण्याआधीच गमरे परिवारात अंधार पसरला.

चिपळूण तालुक्यातील बामणोली बौद्धवाडी येथील वामन काशीराम गमरे यांचा जन्म 13 जानेवारी 1956 साली झाला. त्यावेळी अतिशय गरीब परिस्थिती होती. शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावरती घेतला. वडीलांच्या पश्चात्य आपल्या पुढच्या भावंडांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी अहोरात्र कष्ट करत आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली. एकत्र कुटुंब त्यानी मरेपर्यंत ठेवले ही त्यांच्या स्वभावातील खासियत होती. अतिशय करारी आवाज, तेवढाच प्रेमळ स्वभाव आणि रंगभूमीशी नाते जोपासणारा हा रंगकर्मी अचानक सोडून जाईल असे कुणालाही वाटले नव्हते.

शालेय जीवनापासून त्यांना सांस्कृतिक कलेची आवड होती. अभिनय, रंगभूषा , आणि नाट्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे. आतापर्यंत त्यांनी सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, लोकनाट्य ,कौटुंबिक असे अनेक विषय असलेल्या 300 हून जास्त नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा बजावत असताना त्यांनी आपला कलेचा छंद जोपासला होता. अत्यंत हुशार आणि सामाजिक बांधिलकी जपणारे, भाषेमध्ये नेहमीच गोडवा व शिस्तप्रिय असे व्यक्तिमत्त्व होते.

वामन गमरे यांना लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड होती. ते नाटकामध्ये विविध भूमिका करायचे. मालिका, नाटक कलाकार, दिग्दर्शक, रंगभूषाकर यामध्ये आपला वेगळा ठसा उमठवला होता. महाराष्ट्रभर रंगभूषाकार म्हणून प्रसिद्ध असलेले विशेषतः कोकणामध्ये सर्वच जिल्ह्यात रंगभूषाकार म्हणून काम त्यांनी केले. त्यांना महाराष्ट्र शासनाने नाटक क्षेत्रातील उत्तम रंगभूषाकार म्हणून सन्मानित केले होते. तसेच विविध सामाजिक संघटनेकडून पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

नटराज मुंबई निर्मित संस्थेमध्ये त्यांनी 32 वर्षे कामकाज केले मात्र त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आणि पूर्ण वेळ रंगभूमीसाठी दिला. त्यांची ग्रामीण भागामध्ये अनेक नाटके मंडळे आयोजित करत असत. खऱ्या अर्थाने नाट्य लेखक यशवंत मांडके यांची ओळख झाली आणि दोघांच्या मध्ये तयार झालेले कलेचे नाते वेगळेच होते. ही जोडी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम करू लागली.

वामन गमरे यांनी कलाक्षेत्राची जेवढे नाते होते. तेवढीच सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली होती. गावच्या मंडळापासून मुंबईपर्यंत त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. प्रत्येक गावातील प्रत्येक युवक असो किंवा वृद्धा असो सर्वांशीच ते प्रेमाने बोलत. त्यांच्या स्वभावाचा गोडवा कोणीच विसरू शकत नाही. मुंबई येथे त्यांच्या आर्थिवावर अंत संस्कार करण्यात आले . यावेळी अनेक नाट्य कलाकार, हितचिंतक यांनी वामन दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्या जलदान विधी मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी रविवार दि. 19 रोजी होणार आहे.