खेड | प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) दापोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बैलगाडी असोसिएशन मान्यतेने १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ यावेळेत हेदली येथे कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.
विजेत्यास १ लाख ११ हजार १११ रूपये, उपविजेत्यास ७७ हजार ७७७ रूपये, तृतीय क्रमांकास ५५ हजार ५५५ रूपये, चतुर्थ क्रमांकास ३३ हजार ३३३ रूपये व पाचव्या क्रमांकास २२ हजार २२२ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या दापोली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष अमित कदम, कार्यक्रमप्रमुख सरवर कुडूपकर यांनी केले आहे