‘उधना-मंगळूर’ला २ अतिरिक्त डबे

खेड (प्रतिनिधी) दीपावली सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने ३ नोव्हेंबरपासून चालवण्यात येणाऱ्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलला तात्पुरत्या स्वरूपात २ अतिरिक्त डबे वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरूवारी जाहीर केले. त्यानुसार स्पेशल २४ नोव्हेंबरपासून २ अतिरिक्त डब्यांची धावणार आहे.

०९०५७/०९०५८ क्रमांकाची उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशल २४, २६ नोव्हेंबर व १, ३, ८, १०, १५, १७, २२, २४, २९, ३१ डिसेंबरदरम्यान दर शुक्रवारी धावेल.
उधना येथून सायं. ७.४५ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.१० वा. मंगळूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात २५, २७ नोव्हेंबर व २, ४, ९, ११, १६, १८, २३, २५, ३० डिसेंबरदरम्यान दर शनिवारी धावणार आहे. २१ डब्यांची स्पेशल वलसाड, वापी, पालघर, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी,
कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी,मडगाव, कॅनकोना, कारवार, अंकोला, गोकर्णा, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका, बेंदूर, कुंदापूरा, उडुपी, मुलकी, सुरतकल आदी स्थानकात थांबा आहे.