नईम मेमन-मुस्कान विरानी यांचा विवाह सोहळा उत्साहात..

मंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी

सावंतवाडी : येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष तथा प्लास्टीक उदयोजक रफीक मेमन यांचे पुतणे तथा उदयोजक हानिफ मज्जीद मेमन यांचा सुपूत्र नईम मेमन यांचा शुभविवाह उदयोजक अल्ताफ विरानी यांची सुकन्या मुस्कान हीच्याशी नुकताच सपन्न झाला.यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वधुवरांना शुभार्शिवाद दिले.यावेळी रिहान मेमन,निहाल मेमन आदी उपस्थित होते.